Author Topic: तुझा फोटो  (Read 604 times)

तुझा फोटो
« on: June 13, 2018, 06:28:07 AM »
*शीर्षक.तुझा फोटो*

नव्याने गोड तुझ्या ओठांना स्पर्श करावा
अन तुझा फोटो पुन्हा चुंबण्यासाठी हवा

दिवसाची सुरुवात
चेहरा पाहून व्हावी
जशी तू चांदणी ती
चंद्राला नकळत मिळावी

प्रेमाचा डाव पुन्हा नव्याने सुरू व्हावा
नव्याने गोड तुझ्या ओठांना स्पर्श करावा
अन तुझा फोटो पुन्हा चुंबण्यासाठी हवा

सारं संपलं मनी हा ठाव
पण पुन्हा तू दिसावी
नवी नवी दिशा का
या मनास पुन्हा असावी

दगडाला या तू नव्याने आकार द्यावा
नव्याने गोड तुझ्या ओठांना स्पर्श करावा
अन तुझा फोटो पुन्हा चुंबण्यासाठी हवा

तू चावी माझ्या साऱ्या
आयुष्याच्या कुलपाची
उघडल नाही म्हणून
तू यावी आयुष्यात कायमची

पुन्हा नव्या रंगाने रंग जीवनात भरावा
नव्याने गोड तुझ्या ओठांना स्पर्श करावा
अन तुझा फोटो पुन्हा चुंबण्यासाठी हवा

तू दिसावी मैफिलीत
नवे डाव सुरू व्हावे
पैंजनाची छन छन ती
धुंदीत अंग सारे भिजावे

चित्रफीतीत मिलनाने त्या रंगमंच सजावा
नव्याने गोड तुझ्या ओठांना स्पर्श करावा
अन तुझा फोटो पुन्हा चुंबण्यासाठी हवा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता