Author Topic: प्रेम निवडुंग  (Read 373 times)

प्रेम निवडुंग
« on: July 05, 2018, 07:19:57 AM »
*शीर्षक.प्रेम निवडुंग*

प्रेम निवडुंगाने हृदयात काटेचं पेरले गं
दुःखाच्या अथांग सागराने मज घेरले गं

इवलीशी आशा
साथ सोडून गेली
बहरणारे काल ते
फुल तोडून गेली

डंख विषारी तुझ्या का शब्दाने मारले गं
प्रेम निवडुंगाने हृदयात काटेचं पेरले गं

नाद उगाच केला
तुझ्या आठवणींचा
आठवणीच तुझ्या गं
गेल्या दोर देऊन फासाचा

हाक देऊन तुला चटकेचं सोसले गं
प्रेम निवडुंगाने हृदयात काटेचं पेरले गं

रात राणी सुगंधित
माझ्या अंगणात होती
हृदय वाळवंट झाले
ती फक्त स्मरणात होती

काल असता समोर हृदय का चोरले गं
प्रेम निवडुंगाने हृदयात काटेचं पेरले गं

उधळला सारा पैसा
तुला मिळविण्याला
जातीने तुझ्या का
नजर लावली प्रेमाला

दैवाने कपाळी नाव जातीचे कोरले गं
प्रेम निवडुंगाने हृदयात काटेचं पेरले गं
दुःखाच्या अथांग सागराने मज घेरले गं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता