Author Topic: कविता  (Read 320 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
कविता
« on: July 05, 2018, 11:29:39 AM »तुझ्या आठवणीने मला
केले किती आतुर


तुडूंब भरलेल्या नभासारखा
भरतो माझा ऊर


तुडूंब वाहणा-या नदीसारखा
वाहतो अश्रुंचा पुर


कंठातुन उमटताहेत फक्त
विरहवेदनांचे सुर


प्रेमवेडे मन गहिवरतो ऊर
कठिण खुप राहणे
तुझ्यापासून दुर


ठोठावत आहेत स्पंदने
हृदयातील माझी
माझ्याशीच होऊन फितुर

Marathi Kavita : मराठी कविता