Author Topic: कविता  (Read 444 times)

Offline kumudkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कविता
« on: July 05, 2018, 12:22:38 PM »
तुझ्या आठवणीने मला
केले किती आतुर
तुडूंब भरलेल्या नभासारखा
भरतो माझा ऊर

तुडूंब वाहणा-या नदीसारखा
वाहतो अश्रुंचा पुर
कंठातुन उमटताहेत
विरहवेदनांचे सुर

प्रेमवेडे मन गहिवरतो ऊर
कठिण खुप राहणे तुझ्यापासून दुर
ठोठावत आहेत स्पंदने
हृदयातील माझी
माझ्याशीच होऊन फितुर
« Last Edit: July 05, 2018, 12:24:00 PM by kumudkadam »

Marathi Kavita : मराठी कविता