Author Topic: दुरावे का  (Read 884 times)

दुरावे का
« on: July 09, 2018, 06:43:41 AM »
*शीर्षक.दुरावे का*

कुढुन कुढुन जीवनात रोज मी मरावे का
तुझ्या माझ्या नात्यात रोज हे दुरावे का

साखळी मनाची
दूरवर बांधली का
दुसऱ्याच्या मनात
तू सखे गुंतली का

स्तब्ध उभा मी तरी हे हेलकावे का
तुझ्या माझ्या नात्यात रोज हे दुरावे का

लपतो तो सूर्य ही
अवसेच्या राती का
मनात तू असता तरी
अंधारलेल्या वाती का

प्रेमात सखे उगाच मागते मला पुरावे का
तुझ्या माझ्या नात्यात रोज हे दुरावे का

साधा असणारा मी
जगतो दुःखात का
झाली जरी राख माझी
तू आहेस सुखात का

संपलो कायमचा मी तरी मागे उरावे का
तुझ्या माझ्या नात्यात हे रोज दुरावे का

क्षितिज ठेंगणे असता
सागराने रुसावे का
मी असता समोर तुझ्या
तू मागे फिरावे का

विरहात सखे मी एकट्याने झुरावे का
तुझ्या माझ्या नात्यात रोज हे दुरावे का
कुढुन कुढुन जीवनात रोज मी मरावे का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता