Author Topic: खोटा करार  (Read 436 times)

खोटा करार
« on: July 11, 2018, 07:04:56 AM »
*शीर्षक.खोटा करार*

तुलाच मिळवणं हा माझा विचार होता
नकळत तू केलेला तो खोटा करार होता

आठवांचा पाऊस आला
स्वप्न ते घेऊन गेला
गजबजलेल्या वाटेवरती
मला एकटा सोडून गेला

भेटणार नाही तरी जडणारा विकार होता
नकळत तू केलेला तो खोटा करार होता

मिलनाची कहाणी
का अधुरी होत गेली
गोंदण हातावर तुझ्या नावाचं
जातांना तू खोडून गेली

तुझ्या मनातून चेहरा नेहमी हद्दपार होता
नकळत तू केलेला तो खोटा करार होता

शीर्षक कवितेचं
अधुरे नेहमी भासते
तू नसतेस जवळ तरी
आस मनी नेहमी असते

तुझ्या नावाने समास वहिचा तयार होता
नकळत तू केलेला तो खोटा करार होता

कडुनिंबाची डहाळी तू
मी दारातील मोगरा होतो
तू सोडून जातांना मी
कायमचा पोरका होतो

तू खेळला का गं असा जुगार होता
नकळत तू केलेला तो खोटा करार होता
तुलाच मिळवणं हा माझा विचार होता


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता