Author Topic: गेली  (Read 496 times)

गेली
« on: July 20, 2018, 09:14:50 PM »
*शीर्षक.गेली*

आयुष्य जगण्याची
वाट मी शोधली होती
खडतर होती पण जगणं
कस असतं शिकवून गेली

प्रेम जस जस होतं गेलं
तस ती हृदयात घर करत होती
घर केलं तिनं पण प्रेम
कसं द्यायचं विसरून गेली

श्वासात माझ्या रोज
जशी जशी ती भरत होती
शेवटचा श्वास घेत होतो
तेव्हा ती दुरुनचं गेली

फुले अंथरलेली होती तिरडीवर
ती एक एक फुल वेचत होती
पण ओंजळीतून अश्रूंची
एक एक फुल उधळून गेली

खेळ माझ्या प्रेमाचा केला
प्रेम देईल इतकीच इच्छा होती
पण साऱ्या आशेवर माझ्या
ती पाणी फिरवून गेली

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता