Author Topic: प्रेम झेपणार नाही  (Read 395 times)

प्रेम झेपणार नाही
« on: July 28, 2018, 06:57:40 AM »
*शीर्षक.प्रेम झेपणार नाही*

प्रेम नकोच आधी म्हणायचो मी तिला
प्रेम झेपणार नाही सांगून थकायचो तिला
 
तरी ती जवळ यायची
हळूच कानोसा घ्यायची
कोण नाही पाहून इशारा करायची
जवळ येऊन गच्च मिठी मारायची

पुन्हा पुन्हा पाहून भारावून जायचो तिला
प्रेम झेपणार नाही सांगून थकायचो तिला

ती जशी जशी जवळ यायची
अत्तराची बाटली फिकी वाटायची
अंधुक धुकं डोळयांसमोर यायचं
त्या गडबडीत माझी मती हरवायची

हरवलो मी तरी आठवण करायचो तिला
प्रेम झेपणार नाही सांगून थकायचो तिला

आठवण फक्त नाममात्र
जाणीव तिला याची नव्हती
प्रेमाच्या गणितात ती
नेहमीचं कच्ची असायची

दुःखात नेहमी मी सोबत द्यायचो तिला
प्रेम झेपणार नाही सांगून थकायचो तिला

अट घातलेली होती
रडू नकोस तू कधी
जरी रडलीस तरी तू
माझे डोळे पुसशील आधी

पुसशील का हे नेहमी विचारायचो तिला
प्रेम झेपणार नाही सांगून थकायचो तिला
प्रेम नकोच आधी म्हणायचो मी तिला


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता