Author Topic: प्रेम नकोच आता  (Read 446 times)

प्रेम नकोच आता
« on: July 29, 2018, 11:28:05 AM »
*शीर्षक.प्रेम नकोच आता*

आता नकोच वाटतंय
कोणावरही प्रेम करायला
अस आतल्या आत मनानं
कोणासाठी झुरायला

अपेक्षा पण करणं ही
मोठी चूक होईल
रडत कढत जगणं ही
नकळत भूक होईल

मिळवणं तुला सारां काही
नशिबाचा खेळ होता
नशिबच साथ नाही देणार
मान्य करणं याला पर्याय नव्हता

पर्याय शोधता शोधता
एक दिवस वय निघून जाणार
तिरडी सजली जाईल तरी
 प्रेम कधीच नाही मिळणार

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता