Author Topic: का  (Read 556 times)

का
« on: July 31, 2018, 07:09:33 AM »
*शीर्षक.का*

मीचं हे दुःख सारे उगा सोसावे का
विरहाच्या गावाला उगा पोसावे का

काळजाची हाक होती
तू डाव हा का खेळला
मनाची बाजू झुकती झाली
तो सूर्य ही का ढळला

काळीज चुर होता वेदनेने हसावे का
विरहाच्या गावाला उगा पोसावे का

मी अशी अन मी तशी
शब्द सारे फोल ठरले
प्रेमाचा गुंता वाढत गेला
सोडतांना काही ना उरले

काहींच नसतांना आशेने असावे का
विरहाच्या गावाला उगा पोसावे का

आणाभाका रोजच्या
तुझी वाणी खोटी ठरली
काळजाच्या हिरव्या रानात
तू काट्याची रोपे पेरली

त्या काट्यांनी तरी असे रुसावे का
विरहाच्या गावाला उगा पोसावे का

उगवते डोळ्यांच्या तळ्यात
तिरस्काराची नवीन कमळे
आकर्षण ना त्याला ही
तुझ्या आशा वागण्या मुळे

तळ्या काठच्या विंचवाने असे डसावे का
विरहाच्या गावाला उगा पोसावे का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता