Author Topic: दुःखी चेहरा  (Read 354 times)

दुःखी चेहरा
« on: August 02, 2018, 07:06:41 AM »
*शीर्षक.दुःखी चेहरा*

आज दुःखी चेहरा कसा लपवू उदास हा
वंचीत मी प्रेमाचा कसा सोसू प्रवास हा

अशीच असते ना
विरुद्ध प्रेमाची किमया
कळणार कधी गं तुला
ही अशी भावनांची दुनिया

खोट्या प्रेमाचा घाव दाखवू कुणास हा
वंचीत मी प्रेमाचा कसा सोसू प्रवास हा

विश्वास दाखवला तू
समीप माझ्या असता
दोन अक्षर ते प्रेमाचे
मागता दाखवला तू रस्ता

वेळ काढू जिंदगी का हात टेकू नभास हा
वंचीत मी प्रेमाचा कसा सोसू प्रवास हा

एक फुल होतं शोधलं
सुगंध त्याचा मिळाला
रोजचा नखरा त्याचा
चांगला अंगलट आला

व्यापले शरीर हे असा त्याचा सुवास हा
वंचीत मी प्रेमाचा कसा सोसू प्रवास हा

लेखणीने धीर सोडला
तुझ्यासाठी जीव सोडला
रोज एक कविता व्हायची
तिनं ही तो गाव सोडला

असा शाप कोणाचा लागला मनास हा
वंचीत मी प्रेमाचा कसा सोसू प्रवास हा
आज दुःखी चेहरा कसा लपवू उदास हा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर