*शीर्षक.तू जेव्हा जवळ असते*
फिरून मागे पाहते तू जग भवळ वाटते
असतोच मी खरा तू जेव्हा जवळ असते
रोज ताट समोर असते
घास तो परका वाटतो
भरवता तू ते दोन घास
हृदयाचा पडदा का फाटतो
तुझं रूप समोर असता कमळ भासते
असतोच मी खरा तू जेव्हा जवळ असते
गाल तुझे नभा परी
रंग तुझा रोज हा नवा
पणती ती शोधतो मी
जिथं फक्त मी असतो दिवा
तुझ्या नावाचे हृदय जिथं ठिगळ नसते
असतोच मी खरा तू जेव्हा जवळ असते
चंद्र तू पुनवेचा अधुरा
मी शेवटचा तो काळ
जीवनाची रात्र झाली
सूचना देणारी तू माळ
तू वीणा ही असता का ती संबळ डसते
असतोच मी खरा तू जेव्हा जवळ असते
हात गाली फिरवता
माझा भ्रम निरास होतो
तार छेडले जातात जेव्हा
मी तेव्हा खरा भरास येतो
रात्र सोबतीला मकरंद आंधळ भासते
फिरून मागे पाहते तू जग भवळ वाटते
असतोच मी खरा तू जेव्हा जवळ असते
✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर