Author Topic: काय गरज होती  (Read 666 times)

काय गरज होती
« on: August 29, 2018, 06:58:23 AM »
*शीर्षक.काय गरज होती*

काय गरज होती गं असं तुटकं बोलायची
कधी काळी तू ही मज येऊन बिलगायची

तुझ्या वाचून जगणं हे
मरणा सारख वाटायचं
जस अंधारलेल्या खोलीत
सारंच अंधुक वाटायचं

सुख असायचं तू जेव्हा सोबत चालायची
कधी काळी तू ही मज येऊन बिलगायची

तू आहेस सुखी
याचे रोज मला भास
जगून घेईल मी पण
नाही देणार आता त्रास

त्रास कुठला तो भीती होती रे गमवायची
कधी काळी तू ही मज येऊन बिलगायची

नको ना मी तुला
आयुष्यात गं तुझ्या
फक्त एक करशील ना
आठवणी जपून ठेव माझ्या
 
आठवणींचं काय आशा ही ती संपायची
कधी काळी तू ही मज येऊन बिलगायची

वागलीस तू कशी ही
मनाची समजून काढली
आवरतांना पसारा आता
ती पत्र ही सारी फाडली

पत्र पाहून ती काहिली मनाची व्हायची
कधी काळी तू ही मज येऊन बिलगायची
काय गरज होती गं असं तुटकं बोलायची

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता