Author Topic: रात्र ही रडते  (Read 1382 times)

रात्र ही रडते
« on: September 06, 2018, 09:26:08 AM »
*शीर्षक.रात्र ही रडते*

चंद्र पाहून सखे जशी चांदणी लपते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

लेखणीची काय चूक
ती असतेच खरी मूक
वेदना मांडल्या जातात
अन हीच तिची भूक

अस वाटतं तुझ्यासाठीच कविता बनते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

माझ्या दारी फुलांची
नवं नवी आरास
तुझ्या येण्याने खरा
घुमतो सर्वत्र सुवास

नको म्हणता सखे ती आरास निखळते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

ओठावर माझ्या तुझ्या
ओठांची गं गोडी
झाली कडू आता तरी
चव चाखू देना थोडी

ओठ भिडल्यावर सारे अंग हे भिनते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

वाट पाहतोच आहे
रंग बदलण्या सारे
हितगुज घेऊन येते
कानी वाहणारे वारे

नाकाच्या रुबाबाने नथ ही मुरडते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

भिजल्या वातीची
काय सांगू कहाणी
माझ्या आसवांची
ती ही झाली दिवाणी

खर्ची पडेल अशी शेवटी दमडीच उरते
चंद्र पाहून सखे जशी चांदणी लपते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता