Author Topic: बालपणीची मैञी  (Read 763 times)

Offline Lalit Patil Sunodekar

  • Newbie
  • *
  • Posts: 6
बालपणीची मैञी
« on: September 26, 2018, 10:23:47 PM »
मैञी  आपली  होती  फार  वेगळी,
एकमेकांना  सावरणारी....

आठवतं का तुला?
बालपणी एकमेकांचा बोट धरून शाळेत जायचो,
तु नाही आलीस तर मी ही शाळेत जात न होतो,
तु तुझ्या डब्यातला खाऊ कुणालाच देत न होतीस,
पण मला दिल्यावाचून खात न होतीस,
बालपणीची मैञी आपली,
काॅलेजमध्ये माञ बदलत गेली,
तुझ्या आयुष्यात कुणीतरी आलं,
बालपणीच्या ह्या मिञाला विसरत गेली,
आयुष्यातला निर्णय तु मला विचारल्याविना घेत न होतीस,
ऐवढा मोठा निर्णय तु मला न विचारताच घेत गेलीस,

तु आयुष्यातली वाट चुकत होतीस,
मी माञ तुला सावरण्याचा प्रयत्न करत राहीलो,
क्षणभरच्या नात्यासाठी,
तु माञ बालपणीची मैञी सोडत गेली,
तु मैञीचा धागा तोडत गेली, मी माञ ती विनत गेलो,

आता तु तुझ्या आयुष्यात मग्न आहेस,
कधीतरी तु येतेस,
पण आता माझ्या घराकडची वाट तुझ्यासाठी अनोळखी झाली,
कधीकाळी त्या वाटेवरून एकमेकांना धरून चालणारी मैञी,
आता माञ एकमेकांच्या आठवणीत साठलेली आहे.........

                                        - ललित पाटील सुनोदेकर -

Marathi Kavita : मराठी कविता