Author Topic: वेदना प्रेमाची  (Read 838 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
वेदना प्रेमाची
« on: December 03, 2018, 07:05:08 AM »
*शीर्षक.वेदना प्रेमाची*

वेदना प्रेमाची आजही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

तुझ्या ही माझ्या ही कधी
जागु दे पुन्हा त्या संवेदना
निस्सीम तुझाच होतांना
जड होतील ही त्या वेदना

हृदयात जपतांना आगही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

तुझं पत्रावळी सारख तुडवन
काळजाला घाव देऊन गेलं
नकळत मग समुद्रावर ही
वादळ विरहाचं घेऊन आलं

रातीच्या वादळाला जागही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

मेहंदीचा रंग चढत होता
तसा ओढणीचा रंग बदलत होता
तेव्हा धरणी ही काटेरी वाटली
बोहल्यावर चा काटा सलत होता

हृदय जळतांना राख ही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

मी ही वाट पाहत होतो
देऊन जाशील तरी सुखाला
विणलेली दोर झालीस तू
अन ताण देऊन गेलीस दुःखाला

गळ्यात दोरीची दाह ही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता