Author Topic: बहुदा  (Read 544 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 89
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
बहुदा
« on: December 08, 2018, 06:57:49 AM »
*शीर्षक.बहुदा*

असे प्रेम पाहून सखे सारे हसतील बहुदा
तुझ्यावर लिहितांना शब्द रुसतील बहुदा

तुझ नेहमीच मला
असं गच्च मिठीत घेणं
लाल ठिपक्यांच्या साडीत
तुझं अस जवळून जाणं

वाटले मनसुबे उधळून लावतील बहुदा
तुझ्यावर लिहितांना शब्द रुसतील बहुदा

मोर पिसाचा गालिचा
अंथरला तुझ्या वाटेवर
येशील तू कधीतरी म्हणून
जीव मी टांगला लाटेवर

एव्हडा वेडा पाहून स्वप्न नडतील बहुदा
तुझ्यावर लिहितांना शब्द रुसतील बहुदा

प्रश्नांची उत्तरे देता देता
जरा जगणं शिकलो होतो
अडखळत जगतांना
मनाने जरासा थकलो होतो

उत्तरे ही जगा समोर फोल ठरतील बहुदा
तुझ्यावर लिहितांना शब्द रुसतील बहुदा

भ्रमा भोवताली मिरवण
मनाच्या अंगलट आलं होतं
आत्मा गाढ झोपेत गेला
मृत्यूला भेदण जड झालं होतं

सरण रचताना विरहाने मढतील बहुदा
तुझ्यावर लिहितांना शब्द रुसतील बहुदा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता