Author Topic: फसवा करार  (Read 546 times)

फसवा करार
« on: December 18, 2018, 06:56:56 AM »
*शीर्षक.फसवा करार*

तू दिसशील म्हणून दिस आरशात गेला
येशील या आशेवर दिस भरवशात गेला

तू अबोल रहायची
जणू काही केलचं नाही
मी अबोल रहायचो
जणू काही लिहलचं नाही

तू अबोल राहून कळलं दिस कशात गेला
येशील या आशेवर दिस भरवशात गेला

फसवा करार केला तू
हृदय हिरवाईने सजवण्याचा
दुष्काळ जाहीर केलास
हाच कट रचला तू रडवण्याचा

अश्रू ही नशेचा होऊन थेट घशात गेला
येशील या आशेवर दिस भरवशात गेला

ओढ तुझ्याकडे असायची
जेव्हा तू स्वतःवर रुसायची
तू लावलेल्या अंदाजावर
हृदयाला ही तू फसवायची

फसवा फसवी चा खेळ कवडशात गेला
येशील या आशेवर दिस भरवशात गेला

हृदय भरलेलं असायचं
ऋतू बदलले तरी जखमांनी
ते असं झाडं असायचं जिथं
असते मैफिल रंगलेली कजव्यांनी

जखम जिरवणारा कळलं अशात गेला
येशील या आशेवर दिस भरवशात गेला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता