Author Topic: हमाल झालो  (Read 384 times)

हमाल झालो
« on: January 08, 2019, 07:21:38 AM »
*शीर्षक.हमाल झालो*

नशीब माझे झाकण्यास रुमाल झालो
जपून ठेवलेल्या दुःखाचा हमाल झालो

विरुद्ध दिशा ही
सरळ भासत गेली
चाहूल देणारी ती
हवा ही हासत गेली

तुझ्या खोट्या प्रेमात कमाल झालो
जपून ठेवलेल्या दुःखाचा हमाल झालो

वटवृक्षाची पारंबी
वेणी सारखी मांडली
सात फेरे घेशील सोबतीला
 पाहून प्रीत सारी सांडली

सात फेऱ्यात सोबतीला कंगाल झालो
जपून ठेवलेल्या दुःखाचा हमाल झालो

तेव्हा देव असता
जरासा ही साक्षेला
हृदय रक्तरंजीत झाले नसते
देह अडला नसता भिक्षेला

देहाची भिक्षा मागतांना हलाल झालो
जपून ठेवलेल्या दुःखाचा हमाल झालो

गवताची पात ती
झुंजूमुंज डोलणारी
या कुशीवरून त्या कुशीवर
सोबती माझ्या बोलणारी

नकळत कुस बदलतांना खुशाल झालो
जपून ठेवलेल्या दुःखाचा हमाल झालो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता