Author Topic: झोप  (Read 213 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
झोप
« on: May 21, 2019, 04:29:35 PM »
अर्धी झोप !
ती अपुरी स्वप्नं पुन्हा
झोप उडवून गेली,
रात्रीच्या त्या काळोखात
डोळे बुडवून गेली.

कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत
स्वप्नं सगळी काळी झाली,
स्वप्नांना त्या रात्रीत गुंतवून
झोप माझी माळी झाली.

डोळे माझे झोप माझी
स्वप्नं का तुझी येतात,
तुझा विषय बोलण्यासाठी
माझी अक्खी रात्र घेतात.

Marathi Kavita : मराठी कविता