Author Topic: कविता जगण्यासाठी  (Read 248 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 89
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
कविता जगण्यासाठी
« on: May 21, 2019, 04:37:22 PM »
*शीर्षक.कविता जगण्यासाठी*

कविता जगण्यासाठी
तुझा आधार हवा होता
मागे न पाहता तू गेलीस
तेव्हाचा हुंदका नवा होता

कसं समजावू तुला मी
तू माझा श्वास होतीस
कवितेच्या प्रत्येक ओळीत
तू म्हणजे खास होतीस

तू वागलीस अशी की
इथेच कविता सुरू झाली
अधुर अधुर वाटलं मन
तेव्हा शब्दांशी जवळीक आली

जगणं मरण लिहतांना
तू आणि मी एकत्र झुरलो
शब्द जोडत गेले कविता होत गेली
लिहितांना कधी मेलो कधी हरलो

अन बघ ना कळलंच नाही
प्रेमाची कविता अपूर्ण राहिली
पण तू गेल्याच दुःख झालं
तिथंच लेखणी अश्रूंत वाहिली

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता