Author Topic: फुलांचा बाजार येथे !!  (Read 185 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 233
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !!
« on: July 22, 2018, 02:54:56 PM »
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
तेरा अधिक दोन किती? (answer in English number):