Author Topic: "यश तुझ्याच हातात आहे"  (Read 1090 times)

Offline Hardik

  • Newbie
  • *
  • Posts: 3
"यश तुझ्याच हातात आहे"
« on: January 20, 2018, 09:58:08 PM »
विचार काय करतोस
काहीतरी करून दाखव..|
वेळ जाईल निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव ...||
लाखो आले आणि गेले
बोलून उपदेश सगळे ,
स्वतः काही नाही केले 
फक्त उपदेश दिले..|
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ
सत्याची साथ तू देउन तर बघ...||
हिंमत आहे तुझ्यात ,
आयुष्याचा शिखर चढण्याची
स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ ...
हीच वेळ आहे ,
योग्य पाऊल पुढे टाकण्याची
काहीतरी करून दाखवण्याची ..
घाबरू नकोस ,निर्णय घे
‌यश तुझ्याच हातात आहे......|||
      Hardik D. Shah
           Mumbai
« Last Edit: January 20, 2018, 10:04:45 PM by Hardik »

Marathi Kavita : मराठी कविता