Author Topic: 🌳🌳धरा...... 🌳🌳  (Read 510 times)

Offline Hemlata Sapkal

  • Newbie
  • *
  • Posts: 8
🌳🌳धरा...... 🌳🌳
« on: June 05, 2018, 05:38:20 PM »
🌳🌳धरा...... 🌳🌳
 ही धरा आपली माय!
शिकवेआपली संस्कृती!!

मग का मांडला छळ!
दाही दिशांनी ओरबडं!!

आक्रंदते ती छाती फोडून!
गड्यांनो जागे होऊ आपण!!

दिले तिने मृदा,वृक्ष अन् जल!
खग,नभ अन् पवन!!

कोणती जागा सांगा
ठेवली आपण सांभाळून!!

ती माय आपली कनवाळू!
देते लेकराले भरभरू!!

मातृ देवो भव,चा करता गजर!
का खाली जात नाही आपली मान!!

ती मागते तुझ्या कडे काय??
तु एक तरी वृक्ष लाव !!

नको करूस संसाधनांचा अति वापर!
ठेव जपुन तुझाच आहे साठा सारा!!

ऐका रे तिचा आवाज!
आणि राखा तिची लाज!!
कारण ही धरा आहे आपली माय!!

                     हेमाराणी
                    9270802921

Marathi Kavita : मराठी कविता