Author Topic: लक्ष्य  (Read 843 times)

Offline Sagar Thombare

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
लक्ष्य
« on: May 26, 2018, 12:19:53 AM »
लक्ष्य

पळणाऱ्या या वेळात
शोधावे साध्य आपले,
छोटेशे का असो
असावे एक लक्ष्य आपले.

करावी जराशी मेहनत
थकले जरी कधी
घ्यावी निसर्गातुनी हिंमत.

फ़क्त धीर ठेव मनी
तो क्षणही येईल,
तहान लागली असता
वाळवंटात पाऊस येईल.

कधी बसू नको थकुनी
हे लक्ष्याचे प्रवासी,
लक्ष तर मिळेलच
आनंद देखील येईल.

                           - सागर प्र.ठोंबरे
« Last Edit: May 27, 2018, 04:28:17 PM by Sagar Thombare »

Marathi Kavita : मराठी कविता