Author Topic: सिंह मी ……….  (Read 670 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
सिंह मी ……….
« on: November 03, 2015, 05:04:13 PM »

मी सह्याद्री, मी अनादिन, अति प्राचीन, जन्म घेतला … ज्वाळातून


सळसळनाऱ्या तेजस्वी , सोनेरी धरणी गर्भातून
सिष्ठ पंचब्राम्हणापंचामृताच्या आवेगातून अन मिलनातून
जन्म घेतला त्या ओढातून
मी ………………………………… मी सह्याद्री


स्वातंत्र्याच्या वेडानेमग . …। ज्वालामुखी उफाळला
मुक्त मंत्र उदगाता आणि शिवनेरीवर जन्मला


हे चंडमुंडभंडासूरखंडणी जगदंबे
उदंड दंड महीशासुर्वर्दिनी दुर्गे
महाराष्ट्र धर्म रक्षिके ये …ये
महाराष्ट्राच्या गंगानो या
महाराष्ट्राच्या पौराणो या
दुध सागरा फेसाळत ये
राजापूरच्या ये …. गंगे ये
किल्ल्यांच्या तट-गटानो या
प्रचंड अवघड बुरुजानो या
जलदुर्गानो , दर्यासह या
तुफान गर्जत लाटांनो या
सप्त सागरानो या, चंद्र सुर्यानो या
ग्रह नक्षत्रानो या …
दाही दिशानो या
देव देवतानो, संत सज्जनांनो ,कुळवंतांनो , मराठ मंडळीनो अवघे अवघे या
आम्ही शिवाजी राजाच चरित्र , मराठी रसाग्रहात गातोय . तुम्ही आयकाला अन पाहायला या —


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।


आपल्या राजाच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा ..!!!


(भैरवगडावरील भैरव मंदिराच्या बाहेर एक महाराजांचा पुतळा आहे, अन मंदिराच्या समोर एक विटेरी बांधकामातील मंदिर आहे. त्यावरच टिपलेले महाराजांची सावली , अशी माझी हि माउली)


एक उनाड क्लिक ..... चेतन र राजगुरू

Marathi Kavita : मराठी कविता