Author Topic: बाप माझा विठ्ठल माय रखुमाई  (Read 564 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
बाप माझा विठ्ठल
माय राखूमाई
वंदितो सदा त्यांना
अन्य देव नाही

पाऊस धो –धो कोसळतांना
बाप डोईवर छत झाला
माय गारठली थंडीत
आम्हा ऊब त्यांनी दिला

भूक पोटास लागता
माय उपाशी झोपली
आमच्या नवीन कापडापायी
बापान फाटकी कापड घातली

ठेच लागता पायाला
माईला वेदना झाल्या
बरे नसतांना आम्हा
बापाने रात्र जागून काढल्या