Author Topic: आयुष्य  (Read 1577 times)

Offline smadye

  • Newbie
  • *
  • Posts: 42
आयुष्य
« on: November 17, 2015, 11:16:16 PM »
आयुष्य

आयुष्य आपले जगायचे
हसायचे, फुलायचे , फुलपाखरासंगे  उडायचे
नात्यांनी ते गुंफायचे
पण त्यात नाही गुंतायचे

आयुष्य हे हसण्यासाठी
रेशीम गाठी विणण्यासाठी
विण असावी नाजूक
मग नक्षी छान होते अचूक

अशी हि रेशीम विणायची
घट्ट त्याची जोड जोडायची
अनुभवाने शिकायची
अलगद गुंता सोडवायची

आयुष्य हे एक गाणे
सात सुरामध्ये रचिले
विविध आलापामध्ये गायिले
म्हणून सुरेल झाले  ऐकणे

आयुष्य एक शुभ्र पडदा
त्याच्यावरचे रंग तुम्ही निवडा
चित्र तुम्ही चितारावे
सुंदर पेंटिंग मग व्हावे

आयुष्य आपले जगायचे
हसायचे, फुलायचे , फुलपाखरासंगे  उडायचे
नात्यांनी ते गुंफायचे
पण त्यात नाही गुंतायचे

                सौ सुप्रिया समीर मडये 
              madyesupriya@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता