Author Topic: काळजी  (Read 1246 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 552
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
काळजी
« on: September 21, 2017, 08:21:05 AM »

काळजी करू नको माझी
काढून आठवण उगाचच
जिथे आहेस तु तिथेच मी
वाटेवर डोळे लावू नको उगाचच ...

काळजी कर जराशी स्वतःची,
काळिज टांगणीला माझे,
माझ्या काळजाच्या काळजीत जे,
असे गहीवरू नको उगाचच ...

काळजीने काळिज तुझे
वेडावून जाईल माझ्यामुळे
तुझा हा कळवळा मला न कळे
असा अट्टहास नको उगाचच ...

बरे चालले आहे माझे ईथे
खुशाल रहा तुही तिथे
समजावून थोडे
मनाला घे
नको काळजी करू उगाचच ...
« Last Edit: March 15, 2018, 11:11:07 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: काळजी
« Reply #1 on: October 18, 2017, 05:13:06 PM »
chan.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]