Author Topic: खरेदी पुलांवरची  (Read 446 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,317
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
खरेदी पुलांवरची
« on: October 09, 2017, 12:34:46 AM »
खरेदी पुलांवरची

पर्स वाले न् साँक्स वाले
या पुलांवरचे फेरीवाले,
कार्यवाही ठोस होताच
चुपचाप ते गायब झाले!

तोंडावरती सण दिवाळी
देते घेते अधीर कि झाले,
पाळा संयम तो खरेदीचा
कळेल त्यांचे काय झाले!

टाळाच खरेदी पुलांवरची
चालण्यासाठी तो वापरा,
एकाही फेरीवाल्या कोणी
देवु नका जराही आसरा!

© शिवाजी सांगळे 🦋

Marathi Kavita : मराठी कविता