Author Topic: कोण आहे तुझं ?  (Read 878 times)

कोण आहे तुझं ?
« on: November 20, 2017, 07:38:01 AM »
कोण आहे तुझं?

कोण आहे तुझं इथं
मनाला अलगद विचारणार
कधी स्वप्नात हरवलेल्या
मनाला अलगद उचलणार

नात्यात हरवलेल्या त्या
 आपले पणाला शोधून देणार
विस्कटलेल्या जिव्हाळयात
प्रेमाची ज्योत लावणार

कोण नाही राहील इथं
हळुवार स्पर्शातून दुःख दूर करणार
ज्याच्या त्याच्या स्वप्नांत गुंतलेत सर्व
कोण मिळणार इथं आपलंसं असणार

✍🏻(कवी. अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता