जीवनी जगावं
कितीही आल्या निराशा,
तरी हरायचं नसतं कधी.
दु:ख बोचलं म्हणून,
रडायचं नसतं कधी.
आसवांना निमंत्रण नको,
ओठांवर हास्य खुलवून,
दु:ख लपवा कायमचं.
धुंडाळू नका स्वर्ग,
निसर्ग हाच इथला स्वर्ग.
माणुसकीचं रान पिकवून,
वाट चुकलेल्यांना वाट दाखवा.
कोण जाणे दिवस उद्याचा,
आजच आनंदात जगा.
हारण्याचे सोडून डाव सारे,
जिंकण्याचं नवं डाव मांडावं.
काळोखाची मोडुनी वाट इथली,
नवा उजेड घेवून जीवनी जगावं.
प्रविण डोंगरदिवे