विटीदांडू माहीत असेल त्यांना,
कितीदा घेत असतील हातात ते क्रिकेट ची बॅट?
त्या ३००० रहिवाश्यांच्या डोंजा गावाला,
भेट देतोय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट..
जुगार, मटक्याचे यॉर्कर्स, दारूभट्ट्यांचे बाऊंन्सर्स,
जोडीला अंधश्रद्धेच्या स्लोअरवनरूपी कल्पना भंपक.
सद्भावना, सदिच्छेची बॅट पारजत,
निघालाय सचिन जिंकायला विकासाचा वर्ल्ड कप..
विकास कशाशी खातात त्यांना कसे असणार ठाऊक,
जिथे साध्या पिण्याच्या पाण्याची ही आहे टंचाई.
इथे #स्वच्छभारत अभियान राबवणे एक मोठे आव्हान,
विकासात अडथळे आणायला पसरलेली रोगराई..
अपुरे शिक्षण, अपुऱ्या मूलभूत सोयी सुविधा,
विकासकामात हातभार लावण्याबाबत खेडुतांची कमालीची उदासीनता.
ह्या टेलएंडर्स प्रमाणेच हातभार लावणाऱ्यांच्या साथीने,
आणून दाखवू शकेल का सचिन ह्या गावी सुबत्ता..
#ChaseYourDreams चा मंत्र सर्वांना सांगत,
सत्यात उतरवलस जसं वर्ल्डकप जिंकायचं तुझं स्वप्न.
तुझ्या दत्तक घेण्याने डोंजा गावाला #अच्छेदिन दिसले,
तर अभिमानाने सर्वांना सांगू हाच आमचा सच्चा #भारतरत्न..
:- मोहित केळकर