Author Topic: सरते वर्ष  (Read 495 times)

Offline suryawanshirohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • suryawanshirohit28.blogspot.in/
सरते वर्ष
« on: December 31, 2017, 07:43:08 PM »
सरतांना वर्ष हे , द्वेष ही अंतरातला सरावा;
टाकुनी कटूपणा मनातला, गोडवा आत्मसात करावा...

विसरुनी सारे भेदभाव, आपुलकी मनी जपावी;
शिदोरी मधाळ आठवणींची, नेहमी पाठीशी ठेवावी...

गुंफूनी फुलांना निराळ्या, सुंदरता फुलमाळेची वाढावी;
करून आपलेसे नव्यांना, गाठ मैत्रीची बांधावी...

उजळुनी निघावी प्रत्येक सकाळ, नव्या किरणांनी;
घेऊन मनी आशा, आयुष्य बदलवण्याची...


रोहित सूर्यवंशी, नाशिक.
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Marathi Kavita : मराठी कविता