Author Topic: जीवन सुंदर करून जाईन  (Read 649 times)

Offline sulabhasabnis@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 101
  • Gender: Female
जीवन सुंदर करून जाईन
« on: January 13, 2018, 03:17:34 PM »गर्द अंधाऱ्या रात्रीत दिवा तेवत ठेवीन
अवघे जीवन मी सुंदर करून जाईन ।। धृ ।।
वैराण माळाच्या मातीत मायेचे बी पेरून
उगवत्या अंकुरांना जिवाभावाने जपून
प्रेमाच्या वृक्षवेली सदा बहरत ठेवीन ।। १ ।।
पानोपानी पडतील दवबिंदू करुणेचे
आशेचे किरण तेज चढवतील मोत्यांचे
मनामनाच्या धाग्याने माळ गुंफत जाईन ।। २ ।।
काजळली मने उजळून जातील ज्ञानाने
आपापले जीवन जगतील तोला- मोलाने
इंद्रधनुषी रंग जगात भरून जाईन ।। ३ ।।
        ---------
« Last Edit: January 13, 2018, 03:19:49 PM by sulabhasabnis@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता