Author Topic: आनंदाची परिभाषा  (Read 833 times)

Offline Akerboy

  • Newbie
  • *
  • Posts: 1
आनंदाची परिभाषा
« on: January 14, 2018, 11:51:56 PM »
!!! आनंदाची परिभाषा !!!

जेव्हा बाळ जन्माला येते,
तेव्हा आईवडीलांच्या चेहऱ्यावर,
एक लाजिरवाणी हास्य असते,
त्याला म्हणतात आनंद II

दारिद्र्यरेषेत जो असतो,
तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवतो,
तो सदैव आनंदी असतो II१II

अध्यात्मिक वातावरण आत्मसात करून,
ज्याचे मन प्रफुल्लीत होते,
तो असतो आनंद II

जेव्हा कुणाला जीवनसोबती भेटते,
जेव्हा ते दोघे लग्नासारख्या पवित्र बंधनात जोडल्या जाते,
तेव्हा त्यांच्या आनंदाला कुठली सीमाच नसते II२II

आईवडीलांचे संस्कार जेव्हा मुले जोपासतात,
त्यांचा मान राखतात, निस्वार्थ भावनेने सेवा करतात,
दोनच शब्द का असेना, पण गोड बोलतात,
त्या आईवडीलांना परमानंदाचा भास होतो II

वाढदिवस साजरा होताना,
जणू नावलौकिकअसल्याचा भास होतो,
सर्वांच्या शुभेच्छा ऐकून जी प्रसन्नता जाणवते,
याहून मोठा आनंद नाही II३II

जोपर्यंत श्वास आहे,
तोपर्यंत आनंद आहे,
जो सुखी आहे, तो आनंदी आहे,
जो दुखी आहे, तोही आनंदी आहे,
आनंद हा जणू विचारांचा एक खेळ आहे II

कधी अशी घटना घडते,
जिथे आनंद नाहीसेच होते,
कधी परिस्थिती अशी असते,
जिथे आनंद जास्त काळ टिकत नसते,
कधी घटनाच अशी घडते,
जेव्हा गगनात सुद्धा आनंद मावत नसते II
वेळ कधी मागे जात नसते,
आनंद कधी परत येत नसते II४II

अखेर, सुखदुखाच्या या जीवनात,
बदलत असतात तर, या आनंदाच्या लहरी II
विभिन्न गोष्टींमुळे,
विभिन्न विचारांमुळे,
प्राप्त होणारा आनंद,
जणू आनंदाची परिभाषाच आहे II५II

                            - अक्षय मुक्कावार

Marathi Kavita : मराठी कविता