Author Topic: स्वच्छता  (Read 722 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
स्वच्छता
« on: January 15, 2018, 10:43:00 PM »

लोकवस्ती,गाव,शहर
स्वच्छता अवलंबावी घरोघर
ईथे नको घाणीचे घर
करावी स्वच्छता खरोखर

करा वेगवेगळी विभागुन मांडणी
ओला कचरा,सुक्या कचर्याची
करा स्वच्छतेची अंमलबजावणी
मदत आरोग्यास स्वच्छतेच्या पहार्याची

नको किटाणुंना निवारा
स्वच्छ जल पिण्यास वापरा
रोग राईचा आवरू पसारा
करू नेहमी ड्राय डे साजरा

गाव आपले आपले शहर
आपण देवू स्वच्छतेवर भर
आरोग्य आपले रोगराईचा उपचार
स्वच्छ जल,वायु,मृदेनेच होणार
« Last Edit: January 17, 2018, 05:40:38 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता