Author Topic: काव्य  (Read 251 times)

Offline Pravin Dongardive

  • Newbie
  • *
  • Posts: 11
काव्य
« on: January 18, 2018, 05:34:23 PM »
      काव्य

शब्दास कवटाळले मी
अन शब्द माझे झाले
लिहून शब्द कागदावर
अन काव्य माझे झाले
काव्य असते व्यथा
माणसाच्या जीवनाची
काव्य असते कथा
निर्जीवांच्या भावनांची
काव्य असते एक प्रवाह
आसवांसवे काळजाला भिडणारा
काहींना आवडते काव्य
काहींना आवडत नाही
पण ज्यांना आवडते
ते मनापासून दाद देतात
डुबून काव्याच्या नशेत
हातात कुणाच्या हात देतात   
काव्याची नशाच असते वेगळी
लागली तर सुटत नाही
पुसली तर मिटत नाही
पेटली तर विझत नाही
मरगळलेल्या मनात
प्राण आणते काव्य
म्हणूनच मी लिहितो काव्य
एका कोऱ्या कागदावर
                       प्रविण  डोंगरदिवे
                       ८८८८१७६१८४ 

Marathi Kavita : मराठी कविता

काव्य
« on: January 18, 2018, 05:34:23 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

sanjay ganesh kolhe

  • Guest
Re: काव्य
« Reply #1 on: February 11, 2018, 12:51:01 PM »
***!! लक्तरांत बांधलेली अब्रू !!**
अंधारल्या वस्तीत, आमची आईबहीण विटाळली जाते .
आणि तुम्ही फिरता, लेक वाचवाची मशाल पेटवून.
दुसऱ्याच सरण पेटवून, अना आपल जाळ विजवून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

साखळ्या हाडमासाला टांगलेल्या, रवंथ करतात इंगळी विंचू.
जळलेल्या देहावर तु चालविला नांगर माझे काळीज थिजले.
आभाळ फाटले, वनवा पेटला, रक्ताची धार तिच्या मानेतून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

कुविचाराचे जंत तुझ्या मनातिल जागोजागी दंश  करतात.
हाडामासाचा खच शोभवस्तू ठेव, आतड्याची तार विण्याला , नि कातडी पृथ्वीला लपेट.
माझं जिवन सार्थक होईल.
जिवंत लाव्हा तो, स्वप्नांचा इतिहास तळहातात बसली गुंडाळून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

भंगलेल्या तुझ्या दुनियेत आई स्वार्थाची प्रिती
 नि रूधिराचीच असते विराट वस्ती.
सुर्य जळला चंद्र वितळला आम्ही दुसर जग निर्माण करतो.
सर्वांना आली सांगून, माणसाला पण आली टाळून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!
                  --- एस.जि.कोल्हे
                  रोहणखेड(आकोला)
09/02/2018 *** 9511922910

sanjay ganesh kolhe

  • Guest
Re: काव्य
« Reply #2 on: February 11, 2018, 12:52:52 PM »
 :laugh: :angel:***!! लक्तरांत बांधलेली अब्रू !!**

« Reply #3 on: February 11, 2018, 12:54:05 PM »
!!**मला कोण वाचवणार**!!

सरणातुन पेटत्या ज्वालेत

कोण मीठ टाकलं !!

तीळ तीळ जळणाऱ्या वेदनेला

मी माझ्या अश्रूंनी विजवलं !!

जातील लेकी सासरी

तु कोणाला बघून रडणार  !!

सांग ना ग आई इथे

मला कोण वाचवणार !!हिच ती काळी यामिनी

माझं काळीज जळत होते !!

उंदीर कुतडतो देह तेव्हा

माझे अश्रू रडत होते !!

आता तु आई कोणाचे

कन्यादान करणार !!

सांग ना ग आई इथे

मला कोण वाचवणार !!बाप,बाप नव्हता तो

साप झाला होता !!

कोणीच नव्हते देहाशी

सुर्यही मावळत होता !!

आई बाबा कुलदिपाच्या लोभाने

तुम्ही पणती तोडनार !!

सांग ना ग आई इथे

मला कोण वाचवणार !!मातेचे उदर नव्हते ते

तुरूंग बनले होते !!

विशाल आसवांना त्यांनी

दोरखंडात बांधले होते !!

परके झाले सर्व

मी कोणाशी स्तवन करणार !!

सांग ना ग आई इथे

मला कोण वाचवणार !!

            --- एस.जि.कोल्हे

17/01/18 रोहणखेड(आकोला)

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):