Author Topic: कशी वाटली आमची दहा बाय दहा ?  (Read 437 times)

Offline siddheshwar vilas patankar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 288
  • Gender: Male
  • siddheshwar patankar
कशी वाटली आमची दहा बाय दहा

आनंद ओसंडून चाललाय पहा

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

सासू लाटतेय चपाती

भाजतेय सून मोठी

धाकटीने घातलाय कपड्याना पीळ   

मधलीने लावलाय पोरांना खीळ

छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं

इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?

महालाला लाजवेल अशी घराची शोभा

महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा

घराला घरपण माणसांनीच येते

भुई चालेल कमी पण लागते घट्ट नातेसिद्धेश्वर विलास पाटणकर  :D :D :D ;D :D :D :D
सिद्धेश्वर विलास पाटणकर C