कुणी अडला,कुणी नडला,
त्याला सावरणं आपलं कर्तव्य,
सेवा द्या सेवा घ्या
खोटे नाही सर्व
एक माञ नक्की,ना कर्त्यांचे नसावे हे पर्व
राष्ट्र उपासना,राष्ट्रीय काया
राहावी मनी राष्ट्र हिताची आस
खोटे नाही सर्व
एक माञ नक्की ,नाकर्त्यांचे नसावे हे पर्व
ना काही माझे,ना काही तुझे
कर्तव्ये निभवली तर आपलेच सर्व
खोटे नाही सर्व
एक माञ नक्की,ना कर्त्यांचे नसावे हे पर्व
अंकूर प्रेमानं कर्तव्यांचे सर्वञ पेरावं
रोपटे हे सतकर्मानं जपावं
खोटे नाही सर्व
एक माञ नक्की ,ना कर्त्यांचे नसावे हे पर्व