Author Topic: मन माझं  (Read 992 times)

Offline sharayukhachane

  • Newbie
  • *
  • Posts: 11
मन माझं
« on: August 24, 2018, 12:30:53 PM »
🙂🙂🙂 मन माझं🙂🙂🙂
आभाळा एवढं मन असावं माझं
नदी सारख प्रेम वाहावं माझं...।

आयुष्यात असच प्रसन्न राहावं
सर्वांवर निःस्वार्थ प्रेम करावं...।

चंद्रासारख शितल हृदय असावं माझं
कस्तुरी सुगंधान जीवन भरावं माझं...।

दुःखाच्या वेलीवर प्रीतीची फुलं फुलवी
कष्टाच्या दिवसातही हर्षाने डुलावी...।

ताऱ्यांसारख लुकलुकत राहावं नावं माझं
नेहमी आशिर्वादांनी जीवन भरावं माझं...।

फुलासारखं निरागस असावं
निर्मळ जला सारखं जगावं...।

आयुष्य असंच संपन्न करावं मी
स्वतःला अर्पण करून मरावं मी...।
                                 
 सौ.शरयू खाचणे🙂

Marathi Kavita : मराठी कविता