Author Topic: गजर  (Read 1012 times)

Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
गजर
« on: October 31, 2018, 10:47:08 AM »

गजर (मराठी कविता - सचिन निकम)
----------------------------------------
रोज रोज तेच तेच
गुऱ्हाळ रटाळ
जन्मल्यावर बाळ
कधी होतो का विटाळ?
मांजर आडवे गेले
अन कसला राहूकाळ?
टिटवी ओरडल्याने
कसले घडणार वंगाळ?
पाल चुकचुकल्याने
बोल सत्य होणार?
अरे कुठवर पाळणार
असले जुनाट विचार?
जन्मसिद्ध हक्कासाठी
कशाला लागतो हडताळ?
पोटभरून हसा खळखळून
सकाळ संध्याकाळ
टेन्शन जाऊध्या चुलीत
लावा त्याला जाळ
वशाट महागले म्हणून
हाना वरपून तूरडाळ
सासू झाली खट्याळ
सून झाली नट्याळ
बाष्पळ बडबड टीवीवर
भोपाळ ते नेपाळ
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
माणुसकीचा दुष्काळ
बेइमान झाली दुनिया
कामाची टाळाटाळ
हपापले भ्रष्टाचारी
टपके पैशाची लाळ
मोकाट सुटली तरुणाई
झाले मुके वाचाळ
सत्याने न्यायाने जगा
घेऊनि उजळ कपाळ
नांदा गुण्यागोविंदाने
जोडा निसर्गाशी नाळ
मन करारे शुध्द
त्यागून अहंकाराचा गाळ
सडा प्राजक्ताचा अंगणात
गळा तुळशीची माळ
मुखी गजर हरिनामाचा
नाचा तल्लीन मृदुंग टाळ.
----------------------------------------
कवी : सचिन निकम, पुणे.
कवितासंग्रह : मुरादमन
----------------------------------------


Marathi Kavita : मराठी कविता