Author Topic: ती होडी  (Read 262 times)

Offline tanksale.ajinkya1012

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
ती होडी
« on: March 18, 2019, 03:48:56 PM »
आज सहज लक्ष गेलं तिकडे,
खरंच किती विलक्षण ती होती,
त्या शांत प्रवाहातही हेलकावे खात असताना,
अतिशय संथ गतीने पुढेच ती जात होती||१||

शीतल वाऱ्याची मजा घेत,
तिरावरच्या झाडांना चिडवत ती होती,
आपल्याच सख्यांच्या खोड्या काढत,
सगळ्यांमध्ये मिसळून ती जात होती||२||

खाली माश्यांशी खेळत असताना,
पक्षांनाही हात ती दाखवत होती,
आपल्याच धुंदीत गर्क असूनही,
नविकाच्या गाण्यांना साथ ती देत होती||३||

कुणी फार विशेष नव्हती,
पण सगळ्यांची प्रिय ती होती,
त्या नदीचा दागिनाच जणू,
फक्त एक लहानशी 'होडी' ती होती||४||

Marathi Kavita : मराठी कविता