Author Topic: माझ्याकडे  (Read 316 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
माझ्याकडे
« on: April 08, 2019, 10:43:07 AM »
*शीर्षक.माझ्याकडे*

ना कसला जमीन जुमला माझ्याकडे
का येतो दुष्मणाचा हमला माझ्याकडे

सुगंधि अत्तराचा वर्षाव का सरणावर हा
ना कसली प्रियसी ना कमला माझ्याकडे

वाट माझी अडवली का कोणी कशाला
देण्यास नाही स्वतःचा इमला माझ्याकडे

वेडा ठरलो नाही प्रेमात  कोणाच्या मी
कोण होता तो येऊन दमला माझ्याकडे

राखणदारी केली त्यानंही माझ्या घराची
पाहून स्वभाव तो ही रमला माझ्याकडे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता