Author Topic: स्वतःसाठी जगावं.....  (Read 717 times)

स्वतःसाठी जगावं.....
« on: April 18, 2019, 12:06:06 AM »
             स्वतःसाठी जगावं.....

सुखाच्या मृगाजळामागे धावताना थोडसं थांबावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

सकाळी उठून थोडसं बसावं,
आरश्यात बघून स्वतःशीच बोलावं,
मनातील अंधाराला दूर सारावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

एकांतात जावून निवांत बसावं,
डोळे मिटून नंतर स्वतःलाच बघावं,
आंतरिक सौंदर्याने आपण तृप्त व्हावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

रात्रीच्या चांदण्यात स्वतःला शोधावं,
चंद्राच्या शितलतेला मनात भरावं,
मनातील दाहकतेला थोडसं शमवावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

स्वतःशीच भांडावं, खेळावं, रडावं, रुसावं,
मनावरच्या ओझ्याला अलगद उतरावं,
सकारात्मतेचं अमृत मनात भरावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

चालताना कधीतरी मागे वळून पाहावं,
मरण्यासाठी जगणं नि जगण्यासाठी मरणं
या चक्रव्यूहाला लीलया भेदावं,
सुखाच्या मृगाजळामागे धावताना थोडसं थांबावं,
आयुष्यात एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं।।

                                        --महेश थिटे,
                                            अहमदनगर,
                                            9156989636

Marathi Kavita : मराठी कविता