Author Topic: हळुवार गुंफते नाते  (Read 285 times)

Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
हळुवार गुंफते नाते
« on: May 09, 2019, 03:49:35 PM »

हळुवार गुंफते नाते

हळुवार गुंफते नाते, कुशीत मायेच्या उबदार
मन गहिवरून जाते, खुशीत छायेच्या अलवार ।।धृ.।।

तुळशीपाशी अजून तेवते, इवलीशी ग पणती
कुरवाळीशी घेऊनि जवळी, आपसूक तरळती मोती
ओंजळीत आणले कोवळे, कवडसे तुजसाठी
बहरला वसंत येण्याने, भूपाळी कोकिळा गाते ।।१।।

सुगरणीच्या खोप्यावानी, सुंदर माझ घरकुल ग
गुण्यागोविंदाने नांदती, आक्षी सुरेख गोकुळ ग
धनी माझा वाघावानी, लेकरं माझी गोंडस ग
अजून काय हवे इथे, सुख भरभरून वाहते ।।२।।

इवलीशी होतीस तेव्हा, माझी लाडकी चिमुकली
हात धरुनी लुटुपुटु, चालायची नखरेली
आता पाहता पाहता, कशी सोबतीने हरखली
आपुलकीच्या ओढीने, मन आनंदात न्हाते ।।३।।
-------------------------------------------------------
गीतकार: सचिन निकम
कवितासंग्रह: मुरादमन


Marathi Kavita : मराठी कविता