Author Topic: जखम  (Read 137 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
जखम
« on: May 20, 2019, 10:59:55 PM »
जखम !
इकडे तिकडे पाहू नको
सरळ चालत रहा,

गर्वाला तु पाळू नको
अभिमान सांभाळत रहा.

कुठेतरी तुला कधीतरी
ठेच लागली असावी,

औषधाच्या नावावर
तुझी जखम सुकावी.

दुखतय दुखतय म्हणून
नुसतं रडू नको,

जखमा होतील म्हणून
पडायचं सोडू नको.

Marathi Kavita : मराठी कविता