Author Topic: अयुष्यावर बोलू काही  (Read 1948 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 557
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
अयुष्यावर बोलू काही
« on: April 17, 2017, 08:55:46 PM »
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही

तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
« Last Edit: April 17, 2017, 09:27:49 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता