Author Topic: hi kavia konachi ahe  (Read 809 times)

Offline niranjan1

 • Newbie
 • *
 • Posts: 3
hi kavia konachi ahe
« on: June 16, 2016, 11:35:47 AM »
वाट ते  सानुली मंद झुळूक मी व्हावे घेइ ल  ओढ तिकडे स्वैर झुकावे  या कवितेचे कवी कोण आहेत

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 150
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: hi kavia konachi ahe
« Reply #1 on: June 16, 2016, 12:17:25 PM »
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेइल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी तर कधी नदिच्या काठी
राइत कधी वा पडक्या वाड्यापाठी

कधी थबकत जावे हळु कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावुन अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार

परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

वेळुच्या कुंजी वाजवुनी अलगुज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज

दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी

स्वछंद अशा ह्या करूनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली, तरंग जावे गात

कवी - दामोदर कारे

Offline niranjan1

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: hi kavia konachi ahe
« Reply #2 on: June 21, 2016, 04:04:33 PM »
thank you..ya kavinvishayi mahiti milu shakel ka?

Offline niranjan1

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: hi kavia konachi ahe
« Reply #3 on: July 09, 2016, 10:29:15 AM »
Ya kavitech Nav kay ahe? dhanywad...