आम्ही गांधीजींचे 3 माकडं
कधीही काहीही ऐकणार नाही,
पाहणार नाही,बोलणार नाही वाकडं
कानावरती हात ठेवून
वाईट काही आम्ही ऐकत नाही
अन्यायाचा आक्रोश, गरिबांची आरोळी,
मरणार्याची हाक, दीनांची केविल वाणी
काही सुद्धा आम्हा ऐकू येत नाही
कारण आम्ही काही ऐकत नाही वाकडं
आम्ही गांधीजींचे ३ माकडं
डोळ्यावरती ठेवून हात
वाईट काही आम्ही पाहत नाही
दुबल्यांवरील अन्याय, गरिबांची अवस्था,
दीनांची परिस्थिती, दुर्बलांचे हाल
काहीच आम्हा दिसत नाही.
कारण आम्ही काही पाहत नाही वाकडं
आम्ही गांधीजींचे ३ माकडं
तोंडावरती ठेऊन हात
वाईट काही आम्ही बोलत नाही
अन्यायाविरूद्ध आवाज उठवत नाही
चीड आली तरी ब्र सुद्धा काढत नाही
सोसाट राहतो, साहत राहतो, पाहत राहतो,
शब्द ही काढत नाही
कारण आम्ही काही बोलत नाही वाकडं
आम्ही गांधीजींचे ३ माकडं
अन काही ऐकलं वाकडं
तर कानात खडे घालतो
काही दिसलं वाईट
तर काना डोळा करतो
अन शेवटी आम्ही मुके होतो
कारण आम्ही गांधीजींचे 3 माकडं
कधीही काहीही ऐकणार नाही
पाहणार नाही बोलणार नाही वाकडं